दरोडेखोर प्रमोद कराळेला अटक

। अहमदनगर ।  दि.11  फेब्रुवारी ।  दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 34, रा. वसंत टेकडी, नगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.


19 फेब्रुवारी 2018 रोजी कांद्याच्या गोण्या घेऊन जाणार्‍या ट्रकला राहुरीजवळ अडवून आरोपी श्यामराव भागवत गाडे (रा. घोरपडवाडी, ता. राहुरी) व त्याच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी कांद्याच्या 450 गोण्यांसह ट्रक चोरून नेला होता.


याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात निष्पन्न झालेला आरोपी प्रमोद कराळे हा फरार होता. हा फरार आरोपी वसंत टेकडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.


त्यानुसार एलसीबीच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन राहुरी पोलिसांच्या हवाली केले. त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यातही एक चोरीचा गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post