....दोषीला कठोर शिक्षा देऊ : मुख्यमंत्री

। मुंबई । दि.28 फेब्रुवारी ।  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. 

 

तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ’, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

 

गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरु. तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. पण एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तपास होता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून आम्ही म्हणू तिच पूर्व दिशा असल्याचं विरोधकांना वाटतं’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post