दरेवाडीच्या सरपंचपदी स्वाती बेरड तर उपसरपंचपदी अनिल करांडे



। अहमदनगर  ।  दि10  फेब्रुवारी । नगर तालुक्यातील दरेवाडी येथिल ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड व अनिल करांडे यांच्या नेतृत्वाखालील  भाजपा पुरस्कृत ग्राम विकास पॅनलच्या सौ.स्वाती सुभाष बेरड तर उपसरपंचपदी अनिल करांडे यांची निवड झाली.

 



 बेरड कुटुंबिय  राष्ट्रीय स्वंयसेवक संध व भाजपाचे निष्ठावान म्हणुन पंचक्रोषित ओळखले जातात, रक्तदान चळवळीत, व समाजकारणात  मोठे योगदान या परीवाराचे आहे. सौ.स्वाती सुभाष बेरड या प्रा भानुदास बेरड यांचे धाकटे भाऊ सुभाष बेरड यांच्या पत्नी  आहेत.


सुभाष बेरड यांनी गावातील ज्या मुलींचे विवाह होतात लग्नाच्या हळदिच्या दिवशी मुलीच्या वडीलांच्या दारी एक झाड (वृक्ष) लावले जाते व मुलगी समजुन त्या रोपट्याचे संगोपन वडीलांनी करावे अशी चळवळ सुरु केली आहे.


त्यास गावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेजारी अनेक गावातील लोकानी ही कल्पना स्विकारली आहे. त्या मुळे लोक चळवळीचे स्वरुप आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post