मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकार्यांना धाडले पत्र
। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे अभियान जोरात सुरू झाले. विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचा अहवाल शाळेत आला. शहरातील बहुतांशी शाळेमध्ये बरेच विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याचे समजताच संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालक चांगलेच धास्तावले आहे.
विद्यार्थीच कोरोनाबाधित आढळल्याने शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मुख्याध्यापकाने थेट शिक्षणाधिकार्यांना पत्र दिले. दरम्यान, ज्या शाळेत काही विद्यार्थी कोरोनाबाधित सापडले. त्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बर्याच शाळा सुरू झाल्या असल्या तरीही अनेकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविलेले नाही. त्यामुळे शाळेतील पटसंख्या नगण्य आहे.
गेल्या 11 महिन्यांपासून कोरोनाचे सावट शहरासह जिल्ह्यावर आजही दिसून येत आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याची मोहिम जोरात सुरू झाली होती. विद्यार्थ्याना मास्क लावून येणे, हात धुणे, जेवणाचा डबा न आणणे, तर काही शाळेत मुलांना तीन दिवस तर तीन दिवस मुलींना बोलविण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी संख्या वाढत होती तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीचे काम जोरात सुरू होते. काही शाळेतील काही. विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल कोरोना बाधित आला. मुख्याध्यापकांसह शिक्षक चांगलेच घाबरले. ही बातमी शाळेतील विद्यार्थ्यांना समजली तर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितली.
त्यानंतर त्या शाळेत कोरोना बाधित विद्यार्थी आढळल्याची माहिती वार्यासारखी पसरली. त्यानंतर खबरदारी म्हणून मुख्याध्यापकाने थेट शिक्षणाधिकार्यांना शाळा बंद ठेवण्याचे पत्र धाडले. त्यानंतर काही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला असून काही शाळा मात्र सुरूच आहेत.
...तर पुन्हा लॉकडाऊनचा जिल्हाधिकार्यांचा इशारा
जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नाही. मास्क वापरा, गर्दी टाळा, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी मनोज पाटील यांनी दिला आहे. लग्न समारंभात 50 जणांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. हा आदेश धाब्यावर बसवणार्या मंगल कार्यालये, लॉन्सवर दंडात्मक कारवाई कारवाईचा इशारा दिला आहे.
