। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरानी आतील 33 लाख 31 हजार 6 रुपयाचा ऐवज चोरुन नेला. हि घटना न्यु टिळकराड वरील जिओ स्टोसर्अ येथे मंगळवारी (दि.16) रोजी 9 वाजल्यापासुन बुधवारी (दि.17) सकाळी 7.45 वाजल्याच्या दरम्यान घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, न्यु टिळक रोड वरील जिओ स्टोअर्स या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात चोरानी तोडून आत प्रवेश केला. आतील 33 लाख 31 हजार 6 रुपयाच्या मौल्यावान रोख, विविध कंपनीचे 102 मोबाईल फोन राऊटर व रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जिओ स्टोअर्सचे मॅनेजर धिरज शिवाजी वारी (वय 29, रा.विठ्ठल मंदीराजवळ, माधवनगर, केडगाव) यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हेमंत मंगाले हे करीत आहेत.
