। अहमदनगर । दि.07 फेब्रुवारी । नगरहुन बायपास रोडने सांगलीकडे जाणार्या ढम्परला 7 ते 8 इसमांनी अडविले. ढम्पर चालकास शिवीगाळ दामदाटीकरीत वीस हजार रुपये बळबजरीने लुटून ठार मारण्याची धमकी दिली. हि घटना निंबळक बायपास शिवरात शुक्रवारी (दि.5) रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास घडली.
याबाबतची माहीती अशी की, नरोतर गुणरिसिंग (रा.मिडरा, खिलैती, जि.कटनी) हे त्यांच्या ढम्पर (क्र.एम.एच.12 क्युजी 4682) घेऊन बायपास रोडने सांगलीकडे जात होते.
लामखेडे पेट्रोल पंपाजवळ त्यांना 7 ते 8 इसमांनी चारचाकी गाडी आडवी घातली आणि ढम्पर चालक सिंग यांना शिवीगाळ केरुन त्यांच्या जवळील 20 हजार रुपये बळजबरीने काढुन नेले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नरोत्तर सिंग यांच्या फिर्यादीवरुन बापू सोनवणे (रा.हिंगणगाव) व इरत 7 ते 8 अनोळखी इसमांविरुध्द भादवि कलम 395, 341 प्रमाणे दरोड्याच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक कणसे हे करीत आहेत.
