कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । नगर-पुणे रोडने भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनरने पुढे चाललेल्या मोटर सायकलस्वारास मागुन धडक दिली. या धडकेत मोटारसायकल स्वार सादीक सय्यद शेख (वय 19, रा.व्हिनेसपुरा सर्जेपूरा ) हा ठार झाला. हि घटना पुणे-रोडवरील एम्स हॉस्पिटल समोर गुरुद्वारा जवळ बुधवारी (दि.10) रोजी रात्री आकराच्या सुमारास घडली.


नगर-पुणे रोडवरील एम्प हॉस्पीटल समोर गुरुद्वारा जवळून भरधाव वेगात जाणार्‍या कंटेनर (क्र.एम.एच.40 बी एफ 9064) ने पुढे चाललेल्या मोटारसायकल (क्र.एम.एच.12, पी.डब्ल्यू 1716) ला पाठीमागुन धडक दिली. या धडकेत मोटारसाकल स्वार जागीच ठार झाला.


याप्रकरणी भिंगार पोलिसानीं शेख नवेद सादिक यांच्या फिर्यादीवरुन कंटनेर चालक शेख हशन शेख गणी (रा.वाळुंज, औरंगाबाद) याच्या विरुध्द भादवि कलम 304 (अ)279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 186,134(अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post