केडगाव येथील घरफोडीत चोरांनी सोन्या-चांदीच्या दागीन्यांसह रोकड पळवली

। अहमदनगर । दि.15 फेब्रुवारी ।  घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सुमारे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.


हि घटना केडगाव येथील अयोध्या नगर येथे बुधवारी (दि.3) 11 वाजल्या पासून ते रविवार (दि.14) च्या सकाळी साडेसात वाजण्याच्या दारम्यान घडली.


याबाबतची माहिती अशी की येथील सराफ व्यवसायिक सचिन भास्कर दिक्षित (वय 42, रा.अयोध्यानगर, केडगाव) हे कुंटुंबासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असता.


अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील बेडरुममध्ये ठेवलेले व देवघरात ठेवलेले 2 लाख 54 हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व 20 हजार 500 रुपये असा ऐवज चोरुन नेला.


या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी संचीत दिक्षीत यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 454,380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केल असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस रणदिवे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post