अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण


जेजूरी  । दि.14 फेब्रुवारी । जेजुरी गडावरील पायरी मार्गावर श्री मार्तंड भैरव देवस्थान समितीतर्फे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. 

 

 

यावेळी अहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंतराव होळकर, राज्यमंत्री दत्ता भरणे, माजी मंत्री महादेव जानकर, आ.संजय जगताप, रोहित पवार, जि.प.अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप जेजुरी, नगरपालिका माझी अध्यक्ष दिलीपदाद बारभाई गारटकर, संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड, माजी आमदार अशोक टेकवडे, जयदीप बारभाई, अंकुश भांड, अमितराजे बारगलकर, वसंतराव चव्हाण, देव संस्थांनचे अध्यक्ष सोलिसीटर प्रसाद शिंदे, विश्‍वस्‍त डॉ.राजकुमार लोडा अड, तुषार सहाणे आदि मान्यवर उपस्तिथ होते


अत्यंत सुरेख आणि कलात्मक दृस्तीकोनातून तयार केलेल्या या पुतळ्याचे प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे यांचा सन्मान छत्रपती संभाजीराजे भोसले याच्या हस्ते करण्यात आला. गडावर  येणाऱ्या  प्रत्येक  भाविकाला  अहिल्याबाईंचा  हा  पुतळा  समाजकार्याची प्रेरणा देत राहील असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. 

(छायाचित्रः विजयकुमार हरिश्‍चंद्रे )


 

Post a Comment

Previous Post Next Post