या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष राजश्री घुले असतील.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अरुण जगताप, आमदार किशोर दराडे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार,
आमदार डॉ. किरण लहामटे व आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारांसाठी तालुकास्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायती ः डोंगरगाव (ता. अकोले), निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर), कंरजी (ता. कोपरगाव), जाफराबाद व मुठेवडगाव विभागून (ता. श्रीरामपूर), खडकेवाके (ता. राहाता), वडाळा बहिरोबा (ता. नेवासे), राक्षी (ता. शेवगाव), चिचोंडी (ता. पाथर्डी), खर्डा (ता. जामखेड), कानगुडवाडी व कोपर्डी विभागून (ता. कर्जत), मढेवडगाव (ता. श्रीगोंदे), जामगाव (ता. पारनेर), टाकळी खातगाव (ता. नगर).
जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी पात्र ग्रामपंचायती
2018-19 : खंडाबे खुर्द (ता. राहुरी) व वाळवणे (ता. राहुरी).
2019- 2020 : गणोरे (ता. अकोले) व आव्हाणे (ता. शेवगाव).
202-21 : निमगाव बुद्रुक (ता संगमनेर) व खडकेवाके (ता. राहाता).
