माळीवाडा बसस्थानक येथून महिलेची दागिने पळवले

। अहमदनगर । दि.21 फेब्रुवारी ।  एसटी बसने प्रवास करण्याकरीता बसस्थानकात गेलेल्या 56 वर्षीय महीलेचे मंगळसुत्र अज्ञात चोराने गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेले. ही घटना माळीवाडा बसस्थानक येथे गुरुवारी दि.18 रोजी दुपारी 1 ते 5 च्या दरम्यान घडली.


याबाबतची माहिती अशी की, मंदा पांडूरंग कदम (वय 56, रा.विघनहर्ता कॉनली, धानोरी, पुणे) या नगरहुन पुणे येथे जाण्याकरीता माळीवाडा बसस्थानकात आल्या असता तेथील गर्दीचा फायदा घेत. अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 91 हजार 500 रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले.


याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सौ.मंदा कदम यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस हवालदार निपसे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post