घरासमोरुन शेळी चोरीला ; शेतकर्‍यानी दिली तक्रार

। अहमदनगर । दि.16 जानेवारी ।  नगर तालुक्यातील हिवरेबाजार येथील एका शेतकर्‍याच्या घरासमोर बांधलेली 8 हजार रूपये किंमतीची शेळी अज्ञात चोरट्यांनी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिवरेबाजार येथील शेतकरी अनिल पोपट ठाणगे यांनी तक्रार दिली आहे. ठाणगे यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, गुरूवारी सकाळी घरासमोर 8 हजार रूपये किंमतीची शेळी बांधली होती.

अज्ञात चोरट्यांनी ही लबाडीच्या चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना शिंदे करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post