। अहिल्यानगर। दि.16 मे 2026 । येथील श्री जैन ओसवाल धर्मशाळा, नविपेठ या संस्थेच्या विश्वस्तपदी श्री. धनराज गांधी यांची निवड झाल्याबद्दल समाज माध्यतातुन त्यांचे अभिनंदन होत आहे. सदारची निवड ही मा.सहाय्यक धर्मदाय सहआयुक्त अहिल्यानगर यांनी केली आहे.
श्री जैन ओसवाल धर्मशाळा, नविपेठ या संस्थेच्या विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर गांधी यांनी समाजामधील सदस्यासाठी या ठिकाणी विविध उपाय योजना करुन समाजातील सर्वांना बरोबर घेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अगोदर जेष्ठ पत्रकार धनराज गांधी यांनी होमगार्डचे माजी समादेशक म्हणून अनेकवर्ष कामे केले आहे. यासह त्यांनी पत्रकारीतीमध्ये काम करत आपला वेगळा ठसा समाज माध्यमात उमटवला होता.
Tags:
Ahmednagar
