न्यू आर्टस् महाविद्यालयातील 14 जणांना प्रोफेसरपदावर पदोन्नती

 कला शाखेतील डॉ.हनुमंत जगताप 

यांच्यासह नऊ रत्नांचा समावेश!

। अहमदनगर । दि.16 जानेवारी । न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील उप्राचार्य डॉ. अरुण पंधरकर, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हनुमंत जगताप यांच्यासह तब्बल 14 जणांना प्रोफेसर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपन्न झालेल्या विषयतज्ज्ञ व निवड समितीसमोरील मुलाखतीत न्यू आर्टस्चे 14 जणांना प्रोफेसर या पदावर पदोन्नती दिली आहे. महाविद्यालयातील कला शाखेतील तब्बल नऊरत्नांसह हिंदी विभागातील विभागप्रमुख डॉ. हनुमंत जगताप व डॉ. अशोक गायकवाड यांचा समावेश आहे.

अ.जि. म. विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा.आ.नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे, सचिव जी. डी. खानदेशे , सहसचिव अँड.विश्‍वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, सर्व मान्यवर पदाधिकारी, संस्था प्रतिनिधी सदस्य प्रा.यू. आर. ठुबे सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्रद्धेय डॉ बी.एच. झावरे सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. 

प्रोफेसरपदापर पदोन्नतीसाठी काही नियम आहेत, त्यामध्ये प्राध्यापक पीएचडी असणे गरजेचे आहे, शोधपत्रिकेचे दहा लेख प्रकाशित होणे आवश्यक आहेत आदि नियम असून त्या सर्व नियमामध्ये पात्र झाल्यानंतर तसेच मुलाखतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर 14 जणांना प्रोफेसरपदावर पदोन्नती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. झावरे यांनी विद्यापीठामध्ये  दि. 8 ते 14 जानेवारी या कालाधवीत जात होते. तसेस संस्था प्रतिनिधी म्हणून यु. आर. ठुबे हे देखिल उपस्थित होते.  

प्रोफेसरपदी यांची झाली पदोन्नती
उपप्राचार्य डॉ. अरुण पंधरकर, हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. हनुमंत जगताप, डॉ. पंढरीनाथ त्रिबंक शेळके, डॉ. लक्ष्मीकांत रमेश येळवंडे, डॉ. किरणे मारुती अंबाडे, डॉ. अशेाक गायकवाड, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, डॉ. बबन तोडकर,डॉ. अमन बगाडे, डॉ. जयश्री मुळे, अरसुळे चांगदेव साहेबराव, डॉ. सुनिल पोकळे, डॉ. जयश्री आहेर, डॉ. दिलीप मोटे यांना प्रोफेसरपदावर पदोन्नती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post