शाळांची घंटा वाजणार!

२७ जानेवारीपासून पाचवी ते 

आठवीचे वर्ग सुरु होणार

। मुंबई । दि.16 जानेवारी ।  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा आता हळूहळू सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. अगोदर नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याबाबतची माहिती वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची लस येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा धोका कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post