जनहित फाउंडेशनचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांचे प्रतिपादन

। अहमदनगर । दि.19 जानेवारी ।जनहित फाउंडेशन अ.नगर यांच्यावतीने कोरोनाच्या काळात सर्वसामान्य व गोरगरिबांची अहोरात्र सेवा करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे सर, लाईफ लाईन उद्योगसमूहाचे नवनाथजी धुमाळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे,इंजि. सुरेश इथापे,डॉ.पारस जांगडा,ललित गुंदेचा,स्वप्नील कुऱ्हे यांचा सन्मानपत्र,पुस्तक व शाल देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अध्यक्ष वैभव कदम यांनी जनहित  फाऊंडेशनने आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची व फाउंडेशनच्या ध्येय व उद्दिष्टे यांची आपल्या भाषणातून मुद्देसूद मांडणी केली.

अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. निमसे म्हणाले की,जनहित फाऊंडेशनचे सामाजिक कार्य हे आजच्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.फाउंडेशनने यापूर्वी केलेल्या रक्तदान शिबिर,सांगली सातारा पूरग्रस्तांसाठीची केलेली मदत,लॉकडाउन काळातील गरिबांसाठी राबवलेले अन्नदानाचा उपक्रम आदी.सामाजिक उपक्रमांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन केले.

नवनाथ धुमाळ म्हणाले की,जनहित फाउंडेशन ने ज्या मान्यवरांचा सन्मान केला आहे.या मान्यवरांची नक्कीच समाजाची आणखीन सेवा करण्याची उर्जा वाढणार आहे.त्यामुळे  सर्वसामान्य व गरजू नागरिकांना आणखीन मदत होणार आहे. फाऊंडेशनच्या आजपर्यंतच्या कामाचे विशेष कौतुक यावेळी धुमाळ यांनी केले.तसेच यावेळी तांबे सर,अविनाश घुले यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब वायकर सर यांनी केले तर आभार संचालक भैरू कोतकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव कदम, उपाध्यक्ष राजेंद्र कर्डिले,अशोक कुटे,विशाल पाचारणे,महेश गाडे, नितीन ढाळे,अन्वर मणियार, संतोष डमाळे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post