जिल्हयामध्ये 325 पेक्षा जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे : राजेंद्र फाळके

। अहमदनगर । दि.19 जानेवारी ।  राष्ट्रवादीने जिल्ह्यातील 325 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. जनतेने पुन्हा एकदा शरद पवार व राष्ट्रवादीवर विश्‍वास टाकला आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडी सरकारने, तसेच पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी चांगले काम केले. कोविडच्या काळात केलेल्या कामाची पावती जनतेने निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व महाविकास आघाडीला देत सत्ता स्थापन करण्याची संधी दिली, असे फाळके म्हणाले.

महाविकास आघाडीने जिल्ह्यात 475 पेक्षाही जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीने जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर यश संपादन केले, असे फाळके यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post