। अहमदनगर । दि.27 जानेवारी । श्रीक्षेत्र वडगाव दर्या तालुका पारनेर येथील जागतिक कीर्तीचे लवणस्तंभ असलेल्या दर्याबाई मंदिराचे आद्य पुजारी गुरुवर्य मधुकर कांबळे गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले आहे.
मधुकर कांबळे गुरुजी हे वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी देवीची पूजा करायला सुरुवात केली होती. या मंदिरात पुजार्यांच्या सोळाव्या पिढीतील वंशज होते. त्याकाळी मंदिरात जाण्यास रस्ता नव्हता मोठा कडा ओलांडून मंदिरात जावे लागत असे.
घनदाट जंगल,कोणी माणूस नाही, वन्यप्राण्यांचा धोका अशा अवस्थेत त्याकाळी ते पूजा करत होते ती सेवा त्यांनी अविरतपणे चालू ठेवले मृत्युसमयी त्यांचे वय 76 वर्षे होते
पंचक्रोशीतील गावांमध्ये ते पूजा विधी करायचे काम करत असतो नगर मधील कल्याण रोडवरील रेणुकामाता मंदिर व आराधना ज्ञानपीठ संस्था व वेद पाठशाळेचे प्रमुख बाळासाहेब कांबळे व दर्याबाई देवीचे पुजारी जितेंद्र कांबळे यांचे ते वडील होते
Tags:
Ahmednagar
