हॉस्पिटलमधून दागिन्यांची चोरी

 । अहमदनगर । दि.27 जानेवारी । हॉस्पीटलच्या चेंजीगरुमधून कोणीतरी अज्ञात चोरांनी 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी चोरुन नेले हि घटना शनिवार दि.23 रोजी रात्री घडली.


या बाबतची माहिती अशी की, शहरातील मध्यवर्ती भागातील एका हॉस्पिटलमध्ये स्टाफ करीता असलेल्या चेंजीगरुममध्ये अज्ञात चोरानी प्रवेश करुन एका नर्सचे 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी चोरुन नेले.


या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 380 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक दुभाळ हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post