यावेळी राज्य उपाध्यक्ष रा .या औटी, संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे भास्कर नरसाळे ,अंकुश बेलोटे, आशाताई फणसे , सुनिता काटकर , राजेंद्र पटेकर ’प्रल्हाद साळुंके, शिवाजी रायकर , अशोक कुटे , आत्माराम धामणे आदी उपस्थित होते अध्यक्षस्थानी सिताराम सावंत होते.
कळमकर पुढे म्हणाले, गुरुकुलने महिलांचा सन्मान केला. त्यांच्या विचाराचा आदर करुन त्यांना व्यक्त व्हायला संधी दिली .महिला गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी आग्रही असतात . राजकारणात महिलांच्या जास्तीच्या सहभागाने संघटना गुणवत्तापुर्ण कार्यक्रमांकडे वळतील.
पुढील तीन वर्षासाठी गुरुकुल,समिती व इतर कार्यकारण्या जाहिर करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र ठाणगे, भिवसेन चत्तर, अंबादास मंडलिक, बाळासाहेब गारगूंड, संजय काळे, जालिंदर खाकाळ, शरद धलपे, दस्तगीर शेख, बबन बनकर, स्वाती गोरे आदिंनी परिश्रम घेतले.
गुरुकुल मंडळामुळे समाजात शिक्षकांचा सन्मान वाढला आहे . शिक्षकांना आश्वासक वाटावे असे गुरुकुल एकमेव मंडळ असल्याचे सांगत केंद्रप्रमुख सुर्यभान काळे , प्रमिला खडके , महादेव गर्जे , राजेंद्र खडके यांनी गुरुकुल मंडळात जाहिर प्रवेश केला .