कापडाच्या दुकानातुन साड्याची चोरी

। अहमदनगर । दि.27 जानेवारी । ग्राहक म्हणून दोन अनोळखी चोरानी दुकान मालकाची नजर चुकवुन 20 हजार रुपये किंमतीच्या चार साड्या चोरुन नेल्या हि घटना मार्केटयार्ड मागील महात्मा फुले चौकातील सरस डिझायनर वेअर्स या दुकानात सोमवार (दि.25) रोजी दुपारी घडली.


या बाबतची माहिती अशी की, मार्केटयार्ड मागील महात्मा फुले चौकातील सरस डिझायनर वेअर्स दुकानात दोन अनोळखी महिला साड्या घेण्यासाच्या निमित्ताने आल्या व दुकान मालकाची नजर चुकवुन दुकानातील 20 हजार रुपयांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या सिल्कच्या वेगवेगळ्या रंगाच्या साड्या चोरुन नेल्या.


या प्रकरणी राहुल नरेंद्र बोथरा (वय 40, रा.बोथरा भवन, मार्केटयार्ड मागे,महात्मा फुले चौक) यांच्या फिर्यादीवरुन भादंविक कलम 380 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक दाणी हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post