। अहमदनगर । दि.20 जानेवारी । जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांची कोविड-19 आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आयोजन करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर अ.ए.सो.च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची कोविड-19 आरटीपीसीआर तपासणी विद्यालयात करण्यात आली.
यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, लॅब इन्चार्ज डॉ.रश्मी पोखरणा, तसेच देविदास शेंडे, संजय वाकचौरे, प्रवीण अहिवाळे, विनायक इदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक संजय पडोळे, पर्यवेक्षक रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य, अभिमन्यू डुबल आदिंसह अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते
