ही स्पर्धा चार गटात होणार आहे. बालवाडी ते तिसरी अ गटासाठी विषय- माझे आवडते कार्टून, भारतीय राष्ट्र ध्वज व माझा काल्पनिक हिरो, चौथी ते सातवी ब गटासाठी विषय- ध्वजारोहन, माझे स्वप्न, लॉकडॉउन मधील एक वेळ, आठवी ते बारावी क गटासाठी विषय- स्वच्छ भारत, वृक्षरोपण, कोरोना योद्धा व खुला ड गटसाठी निसर्ग रम्य दृश्य हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहे.
विजेत्या स्पर्धकास आकर्षक ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र बक्षिस स्वरुपात देण्यात येणार तर स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती नेटकेज ड्रॉईंग अकॅडमीचे संचालक प्रवीण नेटके यांनी दिली आहे.
स्पर्धेला येताना स्पर्धकांनी रंग व इतर साहित्य बरोबर आनावे चित्र काढण्यासाठी कागद स्पर्धेच्या ठिकाणी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क प्रवीण नेटके 8087516449 व प्रशांत पाटोळे 8087870899.
