नेवाशाजवळ टेम्पोच्या घडकेत दुचाकीस्वार ठार

। अहमदनगर । दि. 23 जानेवारी ।  औरंगाबादकडुन नगरकडे भरधाव वेगात येणार्‍या टेम्पोने समोरुन येणार्‍या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हि घटना नगर-औरंगाबाद रोडवरील शिंगवे तुकाई फाट्याजवळील गॅलक्सी कंपनी समोर घडली.

या बातमीची माहिती अशी की, नगर-औरंगाबाद रोडने नगरहुन औरंगाबादकडे मोटार सायकलवरुन जाणार्‍या लक्ष्मीकांत रामदास कुमरवाडे (वय 23, रा.घोडेगाव, ता.नेवासा) याला समोरुन येणार्‍या टेम्पो (क्र.एम.एच.16 एई 4962) ने जोरात धडक दिली.

या धडकेत मोटारसायकल स्वार गंभीर जमखी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच टेम्पोचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

या प्रकरणी सोनई पोलिसांनी ओमन आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन टेम्पोचालकाविरुध्द भादविक 304 (अ),337,338 सह मोटार वाहन कायदा कलम 184 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक तुपे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post