रोकडसह मोबाईलची चोरी

। अहमदनगर । दि.16 जानेवारी । नगर मनमाड रोडवरील बंद ढाब्यासमोर असलेल्या रोड मधुन कोणीतरी अज्ञात चोरानी पाच हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल व रोख रककम असा 18 हजार 300 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना गुरवारी (दि.14) रोजी रात्री घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संदीप पांडुरंग नरवडे (वय 23 रा.संबिदने शिरुर जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हयाची नोंद केली आहे.  पुढील तपास पोलिस नाईक शिंदे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post