नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला


नगर, (दि.07 डिसेंबर) : नगर शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. घरे गारठली आहेत, तर नदी-नाल्याकाठच्या परिसरात थंडीचा कडाका तीव्रतेने जाणवत आहे. यातुन आता अनेक भागता शेकोट्या पेटल्या आहेत.


राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. अहमदनगरसह पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसत आहे.


तापमानाचा पारा घसरल्याने पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. थंडीची चाहूल लागल्यामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post