मार्केटयार्ड परिसरात दुकान फोडून खाद्य पदार्थाची चोरी


नगर, (दि.11 डिसेंबर) :  शहरामधील कायम वर्दळीच्या परिसर म्हणून ओळखला जाणार्‍या मार्केटरार्ड भागामध्ये पुनम मोती नगर येथील दुकान फोडून खाद्य पदार्थाची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे.
 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील पूनम मोती नगर येथे श्रीकांत कचकल यांचे महावीर दूध डेअरी व जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. कचकल यांनी गुरवारी दि.10 रोजी रात्री दुकान बंद करुन घरी गेल्या.


शुक्रवारी दि.11 रोजी सकाळी ते पुन्हा दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी दुकानात मोठ्या प्रमाणात उचका-पाचक केल्याचे आढळून आले.


दुकानाच्या गल्ल्यामधून पाचशे ते सहाशे रुपयांची चिल्लर देखील चोरट्यानीं चोरुन नेली आहे. याच बरोबर खाद्य पदार्थाच्या बरण्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. या दुकानात दुसर्‍यांदा चोरी झाली आहे. याप्रकरणी कचकलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post