नगर, (दि.11 डिसेंबर) : खानावळीच्या नावाखाली 3 लाख 2 हजाराचा ऐवज लांबविला. ही घटना दि.29 नोव्हेंबर रोजी नागापूर येथे घडली.
याप्रकरणी शिवशंकर बबन दराडे (रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशिम, हल्ली रा. विखे पाटील हॉस्पिटल कॅम्पस मेस नं 5) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पितळे कॉलनी (नागापूर) येथील महिलेने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दराडे याने विखे पाटील मेडिकल कॉलेज येथील खानावळ चालविण्यास घेतली होती.
त्यास विखे पाटील संस्थेशी खानावळीचा केलेला करार संपत असल्याचे माहिती असतानाही, आम्हाला 11 महिन्यांसाठी खानावळ कराराने चालविण्यास देऊन त्याने आमच्याकडून खानावळीच्या भांड्याच्या मोबदल्यात 1 लाख 50 हजार रूपये घेऊन आमची फसवणूक केली.
तसेच दि.29 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास आमच्या घरी येऊन माझ्या पतीच्या मोबाईलमधून गूगल पे करून 58 हजार रूपये परस्पर काढून घेतले.
