आतापर्यंत ६२ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१९ टक्के
नगर, (दि.06 डिसेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज १७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ३९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५०९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८४ आणि अँटीजेन चाचणीत ७० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६,पारनेर ०२, संगमनेर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ०९, कर्जत ०१, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण १२, नेवासा ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०२, राहाता १२, राहुरी ०२, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, जामखेड ०२, कर्जत ११, कोपरगाव ०३, नेवासा ०८, पारनेर १२, पाथर्डी १८, राहाता ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले ०९, जामखेड ०२, कर्जत ०७, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ०१, नेवासा १४, पारनेर १५,पाथर्डी २१, राहाता १२, राहुरी ०७, संगमनेर १६, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०५ श्रीरामपूर ०८, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
* बरे झालेली रुग्ण संख्या : ६२३९१
* उपचार सुरू असलेले रूग्ण : १५०९
* मृत्यू : ९६३
* एकूण रूग्ण संख्या : ६४८६३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: ०६ डिसेंबर, २०२०, सायंकाळी ६-३० वा
Tags:
Ahmednagar
