अहमदनगर जिल्ह्यात आज ११० नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

आतापर्यंत ६६ हजार ७४२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के

आज १८० रूग्णांना डिस्चार्ज तर 

११० नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर


नगर, (दि.29 डिसेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज १८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ७४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. 

दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९७७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६ आणि अँटीजेन चाचणीत ४३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९,  कर्जत ०३,  कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ०१अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१,  पाथर्डी ०३, राहाता ११, संगमनेर ०१, श्रीरामपूर ०१, मिलीटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२,  जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०८, नेवासा ०२, पाथर्डी ०३, राहुरी ०१,  संगमनेर १५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०६, अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, अकोले ०६,  कर्जत ०४, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०३,  पारनेर ०५,  पाथर्डी १९, राहाता २५, राहुरी ०४, संगमनेर २९, शेवगाव १५, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि जिल्ह्याबाहेरील ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : ६६७४२

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ९७७

*मृत्यू : १०४३

*एकूण रूग्ण संख्या : ६८७६२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका; पसरू देऊ नका

माझे कुटुंब माझी जबाबदारी      


Post a Comment

Previous Post Next Post