नगर, (दि.14 डिसेंबर) : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अभिप्राय नोंदणीत राज्यात अहमदनगरच्या ओबीसी सेलने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार प्रफुल्ल पटेल, नामदार नवाब मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गवळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाचा केवळ उल्लेख करुन चालणार नाही तर त्यांच्या विचाराच्यादृष्टीने आपण गेले पाहिजे. ज्यांच्यापासून आणि ज्यांच्या विचारापासून शिकलो त्याचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे आवाहन पवार यांनी तरुण पिढीला केले.
