निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरात विद्या कॉलनी, समतानगर, पावन म्हसोबानगर, हॅपीथॅट,आदर्शनगर, आनंद पार्क, सुयोग पार्क, अनुसायानगर, अमितनगर, जाधवनगर, रिया पार्क, श्रीकृष्णनगर, मेवाडनगर, शिवाजीनगर परिसरात अनेक लहान-मोठ्या वसाहत असून, यातील बहुतांशी लोक नोकरदार असल्याने कामानिमित्त बाहेर असतात.
याचा फायदा घेत चोरटे हे दिवसासुद्धा घरफोड्या करुन चोर्या करत आहेत. रात्री तर हे चोरटे हत्यारांसह वावरतात. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या भागास भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चोरी घटना व चोरटे सीसीटीव्हीमध्येही दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील काही भागातील नागरिका रात्रीची गस्तही घालत आहेत. पोलिसांचा राऊंड होत असला तरी पोलिसांची आणखी गस्त वाढविण्याची गरज असल्याचे सचिन शिंदे यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी उत्तमराव राजळे, दिनकर आघाव, शेखर उंडे, बाळासाहेब लवांडे, गणेश जंगम, जयप्रकाश डिडवाणीया, दत्तात्रय शिरसाठ, सतीश गिते, राहुल चौरे, वैद्य सर आदी उपस्थित होते.
