नगर, (दि.04 डिसेंबर) : जिल्हयातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथील नेत्रविभागामध्ये नियमितपणे बाह्यरुग्ण विभाग व शस्त्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्हयातील सर्व नेत्र रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.
तसेच अहमदनगर जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय,नेवासा, कर्जत, पाथर्डी, संगमनेर, अकोले व राहाता येथे लवकरच नेत्ररुग्णांविषयक शस्त्रक्रिया सुरु करण्यात येतील. तरी संबंधीत तालुक्यातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा.
त्याच प्रमाणे जिल्हा रुग्णालयामध्ये येत्या काही दिवसातच नेत्ररोपण, रेटायनल सर्जरी, तिरळेपणा, पडद्याचे ऑपरेशन इ. सुविधा लवकरच उपलब्ध होतील. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी कळविले आहे.
Tags:
Ahmednagar
