बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के
आज ११३ रूग्णांना डिस्चार्ज तर
१६८ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
नगर, (दि.30 डिसेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०३० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९२ आणि अँटीजेन चाचणीत ४१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले ०३, जामखेड ०३, पाथर्डी ०३, संगमनेर ०६, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ०२, कर्जत ०४, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १०, नेवासा ०८, पारनेर ०२, पाथर्डी ०७, राहाता ०५, राहुरी ०३, संगमनेर ११, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०५, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ४१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०२, अकोले ०४, कर्जत ०३, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०२, पाथर्डी ०६, संगमनेर १५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, जामखेड ०१, कर्जत ०३, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०८, राहाता ०८, राहुरी ०१, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या : ६६८५५
*उपचार सुरू असलेले रूग्ण : १०३०
*मृत्यू : १०४५
*एकूण रूग्ण संख्या : ६८९३०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक:३० डिसेंबर, २०२०, सायंकाळी ६-१५ वा
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका; पसरू देऊ नका
माझे कुटुंब माझी जबाबदारी