सराईत गुन्हेगार ‘एलसीबी’च्या जाळ्यात!

 


नगर, (दि.12 डिसेंबर) :  मोबाईल शॉपी फोडून घरफोडी करणार्‍य अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. 



योगेश काळू निरगुडे असे या आरोपीचे नाव आहे. त्याने देवठाण (अकोले) येथील मोबाईल शॉपीचे दुकान फोडून 22 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. 



मयूर अशोक कातोरे, सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत (रा. शिवडी, ता. सिन्नर) यांनी मिळून ही चोरी केली होती. याबाबत गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती.



त्यानुसार पोलिसांनी शिवडे येथे जाऊन त्यास जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या आरोपीविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post