कांद्याला तीन हजार रुपये भाव

नगर, (दि.27 डिसेंबर) : नेप्ती येथील नगर कृषी उत्पन्न उपबाजार समितीमध्ये शनिवारी (दि.26 डिसेंबर) रोजी झालेल्या लिलावात कांद्याला 3 हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. 

मागील आठवड्यात घसरलेले कांद्याचे भाव चालू आठवड्यात काहीसे वाढून भावात स्थिर राहिली आहे. दोन आठवड्यापूर्वी कांद्याचा भाव वाढला होता. मात्र मागील आठवड्यात तो पुन्हा एकदा खाली आला आहे. 

शनिवारी नेप्ती येथील उपबाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याची 38 हजार 835 क्विंटल आवक झाली होती.

नंबर एकच्या कांद्याला 2 हजार 400 रुपये ते 3 हजार रुपये भाव मिळाला. सध्या कांद्याच्या भावात स्थिरता असल्याने ग्राहक समाधानी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post