सात लाखांच्या पर्सवर चोरट्यांचा डल्ला!

 

नगर, (दि.10 डिसेंबर) : लग्न समारंभातून सात लाखांचा ऐवज असल्याची पर्स लांबविल्याची घटना चास शिवारात घडली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

सचिन गुंदेचा (वय 46, रा. बार्शी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. तालुक्यातील चास शिवारात लग्न समारंभासाठी आले होते. लग्नातून अज्ञात इसमाने गुंदेचा यांच्याकडे असलेली पर्स लांबवली. 

 

पर्समध्ये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने तसेच हिर्‍याचे दागिने असा सात लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल होता. आपल्याकडे असलेल्या पर्सची चोरी झाल्याचे गुंदेचा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post