एसटीच्या पार्सल सेवेसाठी माथाडी कायदा लागू करा


नगर, (दि.11 डिसेंबर) : माथाडी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पार्सल सेवेच्या ठिकाणी माथाडी कायदा १९७९ नुसार अंमलबजावणी करण्याच्या मागणी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी कार्यालयाचे निरीक्षक एस. सी. देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे शहर जिल्हाध्यक्ष ऋषिकेश ताठे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष सागर गुंजाळ, राजू पवार, गणेश झिकरे, विशाल मांडे, निखिल ताठे आदी उपस्थित होते.


माथाडी मंडळाच्या विभागात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे जितके बसस्थानक आहे. त्या ठिकाणी कामगार पार्सलचे उतराई, चढाई, वाहतूक, थापी ही माथाडीची कामे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post