नगर, (दि.05 डिसेंबर) : हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा महिला सुरक्षिततेचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेऊन सौ. रेखा जरे हत्याकांडातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा सौ.रेश्मा आठरे यांनी केली आहे. या संदर्भात आठरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे की, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ.रेखाताई जरे यांची दि.30 नोव्हेंबर 2020 रोजी हत्या करण्यात आली होती. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. कारण त्या त्यांच्या कुटुंबियांसमवेत गाडी चालवत असताना अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली.
त्यांचे सामाजिक क्षेत्रातील त्यांचे
काम उल्लेखनीय होते. त्यामुळे ज्या महिला सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य
करतात त्यांना असुरक्षितता वाटत आहे. त्यामुळे परत एकदा महिलांच्या
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
