निंबळक गणात अंगणवाडयाना खेळाच्या साहित्याचे वाटप


नगर, (दि.12 डिसेंबर) : नगर तालुका पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प यांच्या वतीने निंबळक गणातील टाकळी खातगाव येथील मिनी अंगणवाडीमध्ये  खेळाचे साहित्य वाटप पंचायत समिती सदस्य डॉ.दिलीप पवार यांच्या हस्ते  करण्यात आले. 


निंबळक गणातील खातगाव, टाकळी, हमिदपुर ह्या गावातील आठ अंगणवाडी सेविकांना हे साहित्य देण्यात आले .शिवसेना जिल्हाप्रमुख मा.शशिकांत गाडे सर यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुका पंचायत समितीचा कारभार उत्तम प्रकारे चालू आहे. सर्व सदस्य प्रत्येक शासकीय योजना तळागाळा पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

कृषी विभाग , मनरेगा मार्फत विहीर जनावर गोठे,  पशू संवर्धन विभाग वतीने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना , तसेच रमाई आवास , शबरी आवास घरकुल योजना , समाजकल्याण विभागाच्या महिला व वंचित घटक यांच्या योजना, विद्यार्थ्यांच्या योजना आदी सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिल्या आहेत. यावेळी सरपंच सुनिल नरवडे, शिक्षक नेते रा. वि.शिंदे सर ,ग्रामविकास अधिकारी  ज्ञानदेव आडसुरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post