नगर - कल्याण रोडवरील हुक्का पार्लरवर छापा : 20 जण ताब्यात

नगर, (दि.29 डिसेंबर) : शहरातील नगर - कल्याण रोडवरील हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला आहे. नगर शहराचे पोलिस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्यासह कोतवाली पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नगर - कल्याण रस्त्यावर हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री हुक्का पार्लरवर छापा टाकला. यामध्ये तब्बल 20 आरोपींना पकडण्यात आले आहे.

त्यांच्याकडून हुक्कयाच्या पाचपट, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ असलेले बॉक्स असा एकूण चार हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पीआय राकेश मानगावकर यांच्या सूचनेवरून पोलिस सबइन्स्पेक्टर कचरे, पोलिस नाईक शाहिद शेख, भागवत, नितीन शिंदे, गणेश धोत्रे, कॉन्स्टेबल कवाष्टे, भारत इंगळे, सुमित गवळी, तानाजी पवार यांनी ही कारवाई केली.


Post a Comment

Previous Post Next Post