शहरामध्ये चोर्‍यांच्या घटनेत वाढ


नगर, (दि.10 नोव्हेंबर) :  चोरट्यांनी रविवारी (दि.8) शहरात तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी लुटल्याचा प्रकार घडला आहे. रविारी रात्री 9 ते 10 यावेळेत या घटना घडल्या. सोनी गिफ्ट दुकानासमोर सुधीर रणखांब यांना अडवून 6 हजार रोख व 8 हजारांचा मोबाईल पळविला आहे.

तर दुसर्‍या घटनेत कुष्ठधाम रस्त्यावर अर्चना भालेराव यांच्याकडील 7 हजार रोख व 5 हजारांचा मोबाईल काढून घेतला.  तर तिसर्‍या घटनेत औरंगाबाद रस्त्यावर बीटीआर गेटसमोर शीतल लोळगे यांच्याकडील 7 हजार रोख ब 8 हजारांचा मोबाईल लंपास केला आहे.

या तिनही प्रकरणी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नाकेबंदी करुन तपासणी सुरू केली आहे.  दिपावलीचा सण जवळ येत असल्याने आता पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post