महिलेची 67 हजारांची पर्स चोरीला


नगर, (दि.10 नोव्हेंबर) : अज्ञात चोरट्याने महिलेची पर्स लांबविल्याची घटना मोचीगल्लीत दि.7 रोजी दुपारी घडली आहे. पर्समधील 67 हजार रुपये किंमीतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.


मिळालेली माहिती अशी की, माणिकनगर येथील एमएसईबी कॉलनी येथे राहणार्‍या महिलेच्या हातीमधील पर्स चोरट्यांनी चोरुन नेली आहे. पर्समध्ये 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, पिळ्याची चांदीचे जोडवे, अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ व रोख रक्कम असा ऐवज होता.


याप्रकरणी कोतवाली पोलिसात महिलेने फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोना जाधव हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post