नगर, (दि.26 नोव्हेंबर) : संविधान दिनानिमित्त शिव - फुले - शाहू - आंबेडकर - साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले तर भीम स्मरणाचे पठण करण्यात आले व आमदार संग्राम जगताप यांचा शिव - फुले - शाहू - आंबेडकर - साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने सविधान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, उबेद शेख, जालिंदर बोरुडे, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, संध्या मेढे, सिद्धार्थ आढाव, विकी साठे, समीर भिंगारदिवे, मोना विधाते, महेश आठवले, राजीव दिवटे, विकी तिवारी, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, दीपक सरोदे, प्रकाश वाघमारे, नितीन घोडके, वैभव जाधव आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य समता व बंधुत्व हेच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया आहे त्यांनी देश अखंड धर्मनिरपेक्ष व एकात्मता राहण्यासाठी संविधानाची निर्मिती केली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले व सुरेश बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनविताना घेतलेल्या परिश्रमाचे कथन केले.
Tags:
Ahmednagar