नगर, (दि.15 नोव्हेंबर) : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ. 5 वी परिक्षेत अहमदनगर
एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी तन्मय दत्तात्रय आडेप याने 94.44 टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय येण्याचा मान मिळविला आहे.
चि.तन्मय यास शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दत्तात्रय व सौ.रेणुका आडेप यांचा मुलगा आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Tags:
Ahmednagar