अजितदादांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन...

मुंबई, (दि.26 ऑक्टोबर) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे अजित पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. अजित पवारांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.


‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अजितदादांनी सांगितले .


तसेच, ‘राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही.


माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’ असंही अजित पवार म्हणाले.दरम्यान मागील आठवड्यात अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली.


कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अजित पवार यांना योग्य ती खबरदारी घेतली. पण, सुरुवातील कोरोनाची चाचणी केली तेव्हा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post