अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चाळीस हजार रुपयांचा ऐवज पळवला

 

श्रीगोंदा, (दि.20 ऑक्टोबर) : नूतन घराचे बांधकाम चालू असल्याने बांधकामासाठी लावलेल्या शिडीवरून  अज्ञात  चोरट्याने  घरात प्रवेश करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


श्रीगोंदा  शहरानजीक मोटेवस्ती, बोरुडेवाडीजवळ फिर्यादी अशोक नारायण मोटे हे शेती करून आपली उपजीविका भागवितात. दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जेवण करून झोपी गेले असता मध्यरात्री ११ च्या सुमारास घराचे बांधकामासाठी लावलेली शिडीचा आधार घेऊन घरावर चढून आत घरात प्रवेश केला.

 

घरातील लाकडी कपाटातील १० हजार रोख रक्कम तसेच ३० हजार किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे मनी, असा एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. चोरट्याच्या अंगात काळा टी शर्ट व नाईट पॅन्ट घातलेली व शरीराने मजबुत व रंगाने काळा असल्याची शक्यता फिर्यादीने दाखल गुन्ह्यात व्यक्त केली आहे. 

 

यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३८०, ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेड.कॉ. रोहिदास झुंजार हे करीत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post