महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर

राष्ट्रवादीचे विपुल शेटीया, अ‍ॅड.राजेश कातोरे, 

शिवसेनेचे मदन आढाव, संग्राम शेळके, तर 

भाजपाचे रामदास आंधळे मनपाचे स्वीकृत सदस्य

नगर, (दि.01 ऑक्टोबर) :  महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी पाच जणांची निवड जाहीर करण्यात आली आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या विशेष सभेत या निवडी जाहीर केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विपुल शेटिया आणि अ‍ॅड.राजेश कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके आणि मदन आढाव, भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.


महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन सभा झाली. या सभेत गटनेत्यांकडून आलेली बंद पाकिटे आयुक्तांनी तपासली केली. त्यानंतर पाचही नावांची घोषणा महापौर वाकळे यांनी केली. पाचपैकी शिवसेनेचे शेळके व राष्ट्रवादीचे शेटिया यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याचा आक्षेप होता. मात्र, तोही यावेळी निकाली काढण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post