जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना डिस्चार्ज तर ४०५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला ३९ हजारांचा टप्पा

आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०५ टक्के


नगर, (दि.01 ऑक्टोबर) : अहमदनगर  जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार  ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१४२ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये महापालिका शेत्रतील ०५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २०७ आणि अँटीजेन चाचणीत १९३ रुग्ण बाधीत आढळले.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७१, अकोले ०३, जामखेड ०२, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण १३, नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता २३, राहुरी ३२, संगमनेर १७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१,  श्रीरामपूर १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १९३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कोपरगाव २०, नगर ग्रामीण १६, नेवासा २४, पाथर्डी २४, राहाता ३६, राहुरी १९, संगमनेर ३२, श्रीगोंदा २१, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ७२४ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १६०, अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९,  कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४२, नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहाता ६८, राहुरी ४३, संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३,इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या : ३९५६२

*उपचार सुरू असलेले रूग्ण : ४१४२

*मृत्यू : ७२४

*एकूण रूग्ण संख्या : ४४४२८


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

दिनांक: ०१ ऑक्टोबर, २०२०, रात्री ७ वा

 

सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा

  

"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"

 

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका  

 

Post a Comment

Previous Post Next Post