महात्मा गांधी जयंती निमित्त वृक्षारोपण, हरियालीचा उपक्रम

नगर, (दि.02 ऑक्टोबर) : येथील पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयी कार्य करणाऱ्या हरियाली संस्थेच्या माध्यमातुन एतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती  निमित्त श्रमदान करुन  विविध प्रजातिच्या ३५१  दुर्मिळ प्रजातिच्या वृक्षांची लागवड मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्ष लावुन करण्यात आल.

 

मागिल वर्षी भुईकोट कील्ला परिसरात ३३ कोटि वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाच्या वतिने ९५० वृक्षांची लागवड करण्यात आली असुन या वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी हरियाली संस्था यशस्वीपणे पार पाडीत आहे. 


या वर्षी हरियाली संस्थेने किल्ल्याच्या बाहेरील परिसरात वड, पिपंल, कडुलिंब, उंबर, करंज या देशी वृक्षांसह शोभिवंत व दुर्मिळ बहावा, बेल, बेहडा, हिरडा आदी ३५१ वृक्षांची लागवड महात्मा गांधी  यांच्या १५० व्या जयंती समारोह समाप्ती व १५१ व्या जयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते अँड.शाम आसावा, सि. जी. पाँवर ली. चे मँनेजर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते वृक्ष लावुन करण्यात आली. या वेळी तुलसिभाई पालीवाल, प्रदिप सालवे,श्री.कृष्णा उपस्थित होते.


हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड़, विष्णु नेटके, दिपक परदेशी, संदिप पावसे, संजय राहुरकर आदिंनी श्रमदान करुन वृक्ष लागवड केली.

Post a Comment

Previous Post Next Post